Thursday, January 31, 2013

तुझ्याशिवाय

सखी, जर जगायचे आहे
..... तुझ्याशिवाय
तर कशाला हवे-
येताना `हाय' जाताना `बाय'!

Sunday, January 25, 2009

चकवा

अगम्या रात्रीनंतर
आशादायी रम्य पहाट
आयुष्य़ाला बसतो चकवा
गवसत नाही पाऊलवाट

Monday, January 19, 2009

नशीब

प्रयत्न शिवण
प्राक्तन उसव
नशीब हा ससा
मी... कासव!

माझ्या मागे!

सारे गेले पुढे
राहिलो मी मागे
परि देव असे माझा
.... माझ्या मागे!